प्रतिनिधी/पनवेल : मनुष्य या पृथ्वीतलावर जन्माला आल्यापासून त्याचे सोहळे चालू होतात. जन्म सोहळा, मुंज, वाढदिवस सोहळा, लग्नसोहळा असे अनेक सोहळे आहेत. पण काही सोहळे हे आनंददायी असतात आणि मनाला चटके देणारे पण. असाच एक सोहळा म्हणजे सेवा निवृत्ती सोहळा. निवृत्त म्हणजे फक्त कामावरून सोडून होणे नव्हे तर कामावरील मित्र , आनंदाचे क्षण , भेटीगाठी या सर्व गोष्टीना पूर्णविराम देण्यासारख आहे. असाच एक निवृत्ती सोहळा श्री.विशवनाथ केशव पाटील यांचा आनंदाने व थाटामाटात पार पडला .श्री.विशवनाथ पाटील हे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेल येथील कर्मचारी असून ३६ वर्ष ६ महिने त्यांनी या कंपनी मध्ये सेवा केली आहे .श्री.विश्वनाथ पाटील यांना पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. प्रेमळ स्वभाव आणि चिकाटी या गुणांमुळे भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनी मध्ये त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे .श्री विश्वनाथ पाटील यांच्या अंगी श्री नानासाहेब धर्माधिकारी यांची शिकवण रुजू असून त्यांचा संपूर्ण परिवार श्री समर्थांच्या बैठकीला नित्यनियमाने हजार असतो .श्री.विश्वनाथ पाटील यांचा सेवा निवृत्ती समारंभ भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेल कंपनी च्या सहकारी , परिवार व मित्रांसोबत खान्देश हॉटेल, खांदा कॉलनी येथे उत्तम पार पडला .श्री.विशवनाथ पाटील यांना युवा महाराष्ट्र न्यूज चॅनेल कडून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ….शुभेच्छुक:श्री.गौरव दत्तात्रेय भेंडे (संपादक : युवा महाराष्ट्र न्यूज )